Mobile Auto Switch ची वैशिष्ट्ये:
- तम्हाला तुमच्या मोबाईलवरून फोन करून अथवा मेसेज करून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून मोटरपंप चालू अथवा बंद करता येतो तसेच आता मोटरपंप चालू आहे की बंद आहे याची स्थिती जाणून घेता येते.
- विहिरीतील किंवा बोरमधील पाणी संपल्यानंतर (ड्रायरन झाल्यानंतर) मोटरपंप आपोआप बंद केला जातो आणि तुम्हाला फोन/मेसेज करून मोटरपंप बंद केल्याचे कळवले जाते
-
ड्रायरन मोड:
- ड्रायरन झाल्यानंतर एका विशिष्ट वेळानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
- ड्रायरन झाल्यानंतर फ्युज/सप्लाय जाऊन आल्यानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
- एकदा ड्रायरन झाल्यानंतर जोपर्यंत मोबाईलवरून मोटरपंप चालू केला जात नाही तोपर्यंत मोटरपंप
बंद राहील याचे सेटिंग करता येते.टाइमर मोड:
- मोटरपंप एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो
उदा. १मिनिट,२मि……..२४तास. - मोटरपंप घड्याळाच्या वेळेनुसार एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो.
उदा. रात्री ११:०० ते पहाटे ०३:००
हा टाईमर एक वेळ सेट केल्यानंतर दररोज सेट केलेल्या वेळेनुसार मोटर चालू बंद करत राहील. पुन्हा पुन्हा सेट करण्याची आवश्यकता नाही. - सायक्लीक टाइमर १ मिनीटापासून २४ तासांपर्यंत सेट करता येतो.
उदा. मोटरपंप १० मिनिटे चालू आणि १ तास बंद आणि पुन्हा १० मिनिटे चालू आणि १ तास बंद असा चालवता येतो. - विद्युत पुरवठा जाऊन आल्यानंतर किती वेळात मोटर आपोआप चालू करायला हवी याचे सेटिंग १ मिनिटपासून २:३० तासांपर्यंत करता येते.
- सर्व टाईमर बंद करून ठेवता येतात
व्होल्टेज सेटिंग
मोटर कमीत कमी किती व्होल्टेज पर्यंत चालायला हवी ते सेट करता येते
कनेक्शन फॉल्ट:
कनेक्शन मध्ये कोणताही बिघाड असेल जसे की मोटरला जाणारी वायर तुटलेली असणे, स्टार्टरमधील रिले ओव्हरलोड झालेला असणे किंवा मोबाइल ऑटोच्या वायर चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या असणे इ., तर मोटरपंप चालू करतेवेळीच तसे वापरकर्त्याला कळवले जाते.
अलर्ट:
- मोबाईल ऑटोस्विच” चक्क तुमच्याशी आवाजात बोलतो.
- मोबाइल न वापरता स्टार्टरवरून जर मोटरपंप कोणी चालू/बंद केला तर युझरला तसे अलर्ट केले जाते.
- सप्लाय व्यवस्थित आल्यानंतर मोटरपंप आपोआप सुरू करायचा की वापरकर्त्याला कॉल/मेसेज करून मोटरपंप सुरू करण्यासंबंधी विचारायचे, याचे सेटिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवता येते.
- फयूज गेल्यानंतर, सप्लाय सुरळीत आल्यानंतर, मोटरपंप चालू/बंद झाल्यानंतर तुम्हाला फोनद्वारे कॉल/मेसेज करून तसे कळवले जाते.
- मोटर चालू झाल्यानंतर मोटरने करंट किती अँपिअर घेतला आहे त्याचा मेसेज पाठवला जातो.
- सर्वात शेवटी मोटर किती वेळ सलग चालू ठेवली होती त्याचा मेसेज पाठवला जातो.
- रजिस्टर केलेल्या ९ मोबाईल नंबरपैकी ज्या नंबरवरून सर्वात शेवटी कॉल/मेसेज आला होता त्या नंबरच्या मोबाईलवर अलर्ट पाठविले जातात.
- मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारा अलर्ट कॉल असावा की मेसेज हे तुम्हाला ठरवता येते.
- ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारे सर्व अलर्ट तुम्हाला चालू अथवा बंद करता येतात.
ट्रू-कॉलर:
मोटरपंप, रजिस्टर केलेल्या नंबरवरूनच चालू/बंद व्हावा की कोणत्याही नंबरवरून चालू/बंद व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
बॅलन्स:
- मोबाईल ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते.
- ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये एकही रुपये बॅलन्स नसेल तरी सिस्टिम चालते.
सेक्युरिटी:
- जर तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” चोरी झाला असेल तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, यामध्ये आहे “ट्रॅकर” आणि “डिव्हाइस लोकेशन” सुविधा. ज्यामुळे तुम्हाला समजेल आता तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” पृथ्वीवर कुठे आहे आणि त्यामध्ये कोणत्या नंबरचे सिमकार्ड टाकले गेले आहे. याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमचा ऑटोस्विच शोधून काढता येईल.
- सिस्टिम चोरी झाल्यानंतर जर तुम्ही “ॲकमॉस” कंपनीला कळवले तर चोरी झालेली सिस्टिम बंद करून ठेवता येते. बंद केलेली सिस्टिम वापरण्यायोग्य राहत नाही.
गॅरंटी:
एक वर्षामध्ये कोणताही बिघाड झाल्यास पीस टू पीस बदलून दिला जाईल.
Aditya Anil Deokar –
One own doubt
No
Aditya Anil Deokar –
9021081956
Jayesh –
Good product
Yogesh –
Hpce industries llp shop no.18 jarvari hsg .society opp p.k. school pimple saudagar pune 411027 mo 9011498839
Ganesh mahadev swamy –
Sawargao
Ram Kale –
मी दोन वर्षांपासून वापरात आहे, एक नंबर ऑटो स्विच आहे.
Samadhan Jagatap –
Best Qulity Mobile Auto Switch
Rajendra Sane –
एक नंबर ऑटो स्विच आहे.
Suresh Ade –
खूप चांगला ऑटो स्विच आहे. 3 वर्षांपासून चालू आहे शेतात.